जयंत, सारंग.... अहो मला फ़ार नाही कळत मात्रा आणि वृत्त वगैरे. हे तुम्हा लोकांचं वाचून वाचून थोडंसं समजवून घ्यायचा प्रयत्न करते. पण पुढे प्रोग्रेस.... ?? अजूनही नाही :(
दोन कविता वाटताहेत? आई गं! आता ह्याला काय सोल्युशन? मला वाटलं होतं की एक छान कथानक तयार झालंय कवितेतून :(
जयंत,
'तुझा वितळता कानी माझ्या
सूर वाजला होता'
ह्याबद्दल म्हणाल तर..... कविता जशी मनात होती तशीच ती कागदावर उतरवली हो. वृत्तामधे एखाद्यावेळी चुकून बसते माझी कविता. पण कवितेत गेयता आणायचा मी नेहेमी प्रयत्न करते कदाचित त्यामुळे असं लिहिलं असेल. आता अजून काय सांगू?