चित्त आपल्या प्रतिक्रियेशी सहमत!

विदर्भातील महार समाजाच्या पोटजातींविषयी मला काहीच माहिती नव्हती.

आमच्या रत्नागिरीत महार समाजात पूर्वी दोन जाती होत्या. पाने महार आणि बेले महार. गंमत म्हणजे पाने पार्वतीचे भक्त आणि बेले शंकराचे भक्त. तो शंकर बिचारा पार्वतीच्या हातचे पदार्थ आनंदात खात असेल पण आमचे हे लोक एकमेकांत रोटीबेटी व्यवहार करत नसत. माझ्या परिचयाच्या एका बाईंनी एका समाजातून दुसऱ्या समाजात लग्न (आंतरजातीय :):)) केल्याने पूर्वी लोकांनी वाळित वैगेरे टाकले होते.

आताच्या पिढीला मात्र हा भेद (बहुदा) ठाऊक नाही.

                                                      साती