कोसळतानाही अश्वत्थाला चिंता
"जातील कुठे हे पक्षी अवखळणारे?"
ह्यात पुढील अर्थ असावेत
- शब्दशः जो वाटतो तो
- सर्वांचा जो आधार असतो तो आपल्या संकटकाळी सुद्धा इतरांचीच चिंता करतो.
- अश्वत्थ हे प्राचीन भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. आता ती संस्कृती आता नाहिशी होत आहे आहे पण ह्या चांगल्या संस्कृतीचे जे फायदे आहेत आहेत त्यांचे काय ही चिंता व्यक्त होते. अवखळणारे पक्षी म्हणजे स्वच्छंद जीवन जगणारी पुढची पिढी असा अर्थ घेऊ शकतो.
- घरातील वृद्धांची मनस्थिती ह्यातून व्यक्त होते. ते आपला अंत जवळ आला असताना देखील मुलाबाळांचा विचार करतात.
ह्या गझलेचे रसग्रहण करायचे आहे पण आम्ही फक्त चित्त ह्यांच्याच गझलेचे रसग्रहण करतो असे होऊ नये.
चित्त त्यांना अभिप्रेत अर्थ सांगतीलच.