जीजी, तुम्ही दिलेले अर्थ योग्य आहेत. इमारतींच्या बागांचा शेर मला पुण्यातल्या पटवर्धन बागेतून जाताना सुचला. हा इतर पार्कांनाही लागू होईल.:)
तक्रार नेहमी असते ही अर्थाला
हे शब्द बिलंदर, बाराचे, छळणारे!
हा शेर मी
कोसळतानाही अश्वत्थाला चिंता
"जातील कुठे हे पक्षी अवखळणारे?"
ह्या शेरावर अडलो असताना सुचला. आधी तिथे 'विव्हळणारे' होते. पण तो खटकत होता. तिथे 'किलबिलणारे', 'चिवचिवणारे' येऊ शकत नव्हते. एका मित्राच्या म्हणण्यानुसार पाखरांची 'वल्नरबिलिटी' तिथे यायला पाहिजे होती. मग 'अवखळणारे' सुचले आणि नंतर छळणारा शेर.
वाटले किती घेतील भरारी आता!
ते किडेच होते साधे वळवळणारे
ह्या द्विपदींत दोन अर्थ आहेत. पहिला स्वतःबद्दल. आपण एखादी गोष्ट मनसुबा घतो. पण तो मनसुबाच राहातो. दुसरा अर्थ स्वतःबद्दल नाही.:)
बाकीचे अर्थ कठीण नसावेत, असे वाटते. असो.
चित्तरंजन