अजयश्री,
या कवितेत २ कविता (कडवे १-३ व ४-६) असे म्हणायचे होते.
पण पुन्हा एकदा वाचल्यावर या ही कवितेत एक समान धागा आहे हे जाणवते.
केवळ एक सूचना म्हणून:
४-६ मध्ये 'होता' ऐवजी 'आहे' वापरल्यास त्याला आजच्या (वर्तमान)स्थितीचा 'फील' येईल व १-३ मधल्या स्थितीशी विरोधाभास आणखी अर्थगर्भ होईल.
तोच मोगरा दारी माझ्या
कसा कोमेजला आहे
आवेग तुझ्या उबदार मिठीचा
आज ओसरला आहे
माळियाने कसा अपुला
वृक्ष दुर्लक्षिला आहे
नजरेत या रे आसवांचा
पूर दाटला आहे
आसवांचे अर्ध्य पिऊनी
मोगरा फुलणार आहे
जागवाया गंध त्याचा
तू पुन्हा येणार आहे!
--- तुझे मत कळव.
जयन्ता५२