माझ्या वडिलांच्या दुर्दैवी मृत्यूचे कारण केवळ त्यांच्या रक्तातील रक्तबिंबिका कमी झाल्या हेच होते. अवघ्या दोन दिवसांत मुंबईच्या लिलावती रुग्णालयासारख्या रुग्णालयात उपचार होत असतानाही आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. उपचारार्थ दोन दिवसातच अडिच लाख रुपये खर्च करुनही  रक्तबिंबिका पुरेश्या न मिळाल्या मुळे आम्ही त्यांचे प्राण गमावून बसलो. माझ्या सारखी वेळ इतर कुणावरही न येवो. साती यांच्या या उपक्रमाच्या मदतीने आपण कुणाला पोरके होण्यापासून वाचवू शकता.