अज्जुका, या प्रकाराला सिनकोप (syncope )असे म्हणतात. खरंच 'होतं असं कधी कधी' :) म्हणूनच पुढच्यावेळी रक्तदान करून उठल्याउठल्या लगेच जास्त धावपळ करू नकोस. आमच्या इथे किंवा बहुदा प्रत्येक पेढीत रक्तदान करून झाल्यावर दात्याला थोडावेळ बसवून चहा- बिस्कीटे दिली जातात ती यासाठीच की थोडासा वेळ विश्रांती मिळावी कारण काही वेळा अन्य काही ताणांमुळे (उदा. यावेळी कदाचित तुझ्या आजीच्या शस्त्रक्रियेचा असेल) आपले शरीर रक्तदानानंतरही लगेचच पूर्वपदावर येत नाही.
थोडक्यात पुढच्यावेळी रक्तदान केल्यावर चहा बिस्कीटे नक्की घे.:):)
कान टोचणे आणि टॅटू याचा रक्तदानाशी संबंध कसा हे कळलं नाही.
कान टोचताना किंवा गोंदताना प्रत्येक वेळी पूरेशी निर्जंतूक केलेली उपकरणे वापरतातच असे नाही. त्यामुळे एच. आय. व्ही. हेपॅटायटीस बी आणि सी यांचे संक्रमण होऊ शकते. म्हणून रक्तदान किमान तीन महिने करू नये. तीन महिन्यांनी तुमच्या रक्तात जर हे जंतू विशेषतः एच. आय. व्ही. असेल तर एलायसा टेस्ट वापरताना कळेल. पण तीन महिन्याच्या आत रुटीन टेस्ट केल्यास ते कळणार नाही आणि रक्तावाटे हे आजार रुग्णाला भेट मिळतील.
अजूनही पाश्चात्य मेडिकल विश्व गोंदणे या प्रकाराची सांगड शिरेवाटे मादक द्रव्य घेणारे तसेच समलिंगी यांच्याशी जोडते. भारतात अशी सर्वसाधारण परिस्थिती नाही कारण भारतात गोंदण्याची परंपराच आहे.
साती