छान उत्तरे मिळाली. एकदा हिमू ताळ्यावर आलं की लगेच जाते.
विषयांतर करतेय.. गोंदणे व टोचणे बद्दल.. पाश्चात्य समजुती पण ना!... पारंपारीक गोंदणे सुई गरम करून करतात ना? मग ती आपोआपच निर्जंतुक होत असणार. आणि आपल्याकडे मशिन ने कान टोचणे आत्ता आले. एरवी सोनाराकडे जायचे. आपली चमकी किंवा सोन्याची तार निवडायची आणि मागच्या खोलीत कारागिराकडे जायचे. तो ती तार जाळावर धरून सरळ करतो. त्याला टोक करतो परत गरम करतो. त्या टोकाने जिथे टोचायचं ती जागा चाचपडतो आणि रक्तवाहीन्या नसलेल्या भागातून बरोब्बर टोचतो. (प्रक्रिया पाठ आहे कारण माझे दोन्ही कान लहानपणचे सोडले तर वरती केवळ हौस म्हणून ३ ठिकाणी मी टोचून घेतलेत आणि नाक ३ वेळेला. दोनदा बुजलं म्हणून..) असो तर मुळात शुद्ध धातू आणि जाळावर धरून गरम केलेला... आणि तोही एकाचा दुसऱ्याला नाही.. मग जंतू??? आपल्या भारतीय पद्धतीच भल्या म्हणायच्या तर..