एक होतकरू कवी होता. (अजूनही जिवंत आहे आणि होतकरूच  आहे.) धर्माने बौद्ध. एके दिवशी माझ्या तीर्थरूपांना भेटायला आले. त्याने डोक्याचा गोटा केला होता. विचारल्यावर सांगितले, "बुढी गेली, म्हणून  टक्कल केले." त्यावर अर्थात माझ्या वडलांनी त्याची बरीच हजामत केल्याचे आठवते. 'तू बाबासाहेबांचा बौद्ध धर्म स्वीकारला आणि हे टक्कल!" असो. तो बराच खजील झाला.

'जय भीम'चा नारा हा एकीचा नारा आहे. तसे देणे मी तरी वाईट मानीत नाही. पण एवढे मात्र खरे बाबासाहेबांची एवढी पूजा होते की बुद्धाची शिकवण विसरली जाते. खुद्द बाबासाहेबांचाही व्यक्तिपूजेला विरोध होताच.

चित्तरंजन