नमस्कार ,
भारतीय घटनेचा सरनामा(प्रस्तावना) हा घटनाकारांच्या मनोभुमिकेचं वर्णन करतो असं म्हणतात. या सरनाम्यात भारताचं स्वरूप पुढील शब्दांत स्पष्ट केलेलं आहे. हे शब्द एका निश्चित क्रमातच आहेत आणि ते तसेच देत आहे.
सार्वभौम , समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रिक गणराज्य.
वरिल शब्दांसोबत आपण परिचीत असालच, तरी लोकतंत्र व गणराज्य या विषयी मी आधीच माहिती दिली आहे. लोकतंत्र मधे देशाचा कार्यकारी प्रमुख लोकांद्वारे निवडला जातो तर गणराज्यात देशाचा सर्वोच्च प्रमुख लोकांद्वारे निवडला जातो. भारत हे लोकतांत्रिक गणराज्य आहे तर इंग्लंड हे फक्त लोकतंत्र आहे.
नीलकांत.