सगळे दोष हे देवाने अमराठी लोकांत वाटून टाकलेले आहेत. ते भामटे आहेत... व्यसनी आहेत. पुण्याच्या सांस्कृतीक वातावरणाची वाट लावने हा 'ते' त्यांचा जन्मसिद्ध हक्क मानतात.

महाराष्ट्रात ना ! सोन्याच्या खाणी आहेत. आणि पुण्यात तर हिऱ्याच्या आहेत. त्यामुळे पुण्याबाहेरचे लोक येथे येतात "आयत्या बिळावर रेघोट्या ओढतात" आणि आम्ही कष्टाळू पुणेकर मात्र माना मोडून कामे करीत असतो.

सकाळ ते संध्याकाळ आम्ही चकाट्या पिटत बसत नाही, तर उत्तर भारतीयांसारखा आम्हाला सुद्धा ढकलगाडीवर भाजिपाला विकण्याच्या धंध्यात नफा असल्याचं जानवलं आहे. आमच्या बोलण्यात नरमाई आहे. आम्ही आमच्या शिवायही कुणाला डोकं आहे हे मान्य करतोय. आम्ही दुकाणात पाट्या /सुचना लटकवण्या ऐवजी गिऱ्हाईकांचा मान राखतो आणि तो पुन्हा परत यावा अशी अपेक्षा ठेवतो.

मोठ मोठाली भाषणं देऊन किंवा लेख लिहून आम्ही भूतकाळातील वैभवशाली पुण्याच्या नावाने फक्त गळा काढण्याच्या ऐवजी भरिव असं काही करतोय.

आता मात्र खरच कुणी बाहेरचा येथे आला ना तर टिकणारच नाही हो! काळजी कशाला?

आणि हो मी पुण्याच्या बाबतीत काहीतरी लिहीतो आहे , म्हणजेच मी शेवटी काहीतरी (काहीही) खडसावलेच पाहिजे नाहीका? 

मग .... हां ! ज्यांना वाटेल त्यांना या लेखावर आक्षेप घ्यायला ते मोकळे आहेत.

नीलकांत