"बॅचमेट्स.कॉम" नावाच्या संकेतस्थळावर फेरफटका मारला- आश्चर्याचा धक्काच बसला. चक्क भुसावळच्या के. नारखेडे शाळेतल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी तेथे नांवे नोंदवलेली होती. शोध कार्यात बरीचशी ओळखीची नांवे सापडली. 

मुख्य म्हणजे एका बाकावर बसणाऱ्या, एकाच पोरीवर लाइन मारणाऱ्या व बाबूराव अर्नाळकरांची पुस्तके एकत्र वाचणाऱ्या  माझ्या वर्ग मित्राशी संपर्क झाला. गेल्या दीड वर्षांपासून सुनील व मी आम्ही परत तोच मैत्रीचा अनुभव चाखतोय.

स्वातीच्या ह्या कथेवरून त्याची आठवण झाली.