"मुंबईय्या लोक प्रामुख्याने ह्या (भिकार)व्यवसायात अढळतात"
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून मुंबईकडे बघितले जाते.
- इथली वाहतूक व्यवस्था एका तासात जितके प्रवासी हाताळते तितके कदाचित पूर्णं अमेरिकेत एका तासात प्रवास करीत नसावेत.
- जेथे अशी व्यवस्था उपलब्ध असते व जेथल्या लोकल/स्थानिक लोकांना त्याची सवय अंगवळणी पडलेली असते ती मंडळी ह्या लिफ्ट मागण्याच्या(भिकार) व्यवसायात येणार नाहीत.
- बाहेरून आलेली काही नतद्रष्ट मंडळी ज्यांना रांगेत बस मध्ये शिरायची बाप जन्मात सवय नसते किंवा कंडक्टरचा डोळा चुकवून तिकिटाचे पैसे वाचवण्याची सवय असते (मी हे पुणेकरांसाठी लिहीत नाही आहे बरे नाहीतर वादंग माजेल) तेच येथे येऊन इथली शिस्त बिघडवतात.
- काही शहरातल्या मंडळींना कारच्या बॉनेटवर हात मारून सांगायची सवय असते; "थांब, मला आधी रस्ता पार करू दे, मग तू जा !".....
असे येथे घडत नसल्याने लिफ्ट देण्यासाठी मुंबईकर थांबतच नाही.
- बाकी..... मुंबईत येऊन राहा, इथले व्हा, सवयी अंगवळणी पाडा व मग असले लेखन करून दाखवा !