माझे काही विचार:
आपल्या या व्यासपीठावर काही व्यक्ति "अशुद्ध" पद्धतीने लिहितात. म्हणजे "ण" च्या जागी "न" लिहिणे वगैरे.
यात सुद्धा बरेच वेगवेगळे प्रकार आहेत.
१. काहीजण टंक-कळीचा चुकून वापर म्हणून तसे लिहितात.
२. काही लोकांना शुद्ध्लेखनाचा मोठा बाऊ करावासा वाटत नाही, किंवा घाईमुळे त्यावर वेळ घालविणे त्यांना अपव्यय वाटतो.
३. याविरुद्ध काहीजण मुद्दाम तशी त्यांच्या आइवडिल-आणि पूर्वजांकडून आलेली जी भाषा चालत आली आहे ती चालू ठेवावी या आग्रहाने, पुस्तकी (आणि ऊच्चवर्णियांनी लादलेली म्हणून निषिद्ध) भाषा अव्हेरतात. त्यांना ती पुस्तकी भाषा अत्युत्तम येत असते तरी ते आपला एक मुद्दा म्हणून तसे लिहितात.
अशाप्रकारे कोणत्या भूमिकेमध्ये शुद्धलेखनाच्या "चुका" घडतात वा केल्या जातात हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
कलोअ,
परभारतीय