काही वर्षांपूर्वी माजोरड्या रिक्षावाल्यांनी अचानक संप केला होता त्यावेळी पुण्यात बसस्टॉपजवळ दुचाकीवाले मुद्दाम थांबून कुणाला लिफ्ट हवी आहे का याची चौकशी करत होते. केवळ 'दुचाकीवरून एकमेकांना लिफ्ट देणे' या एका शस्त्राने हा संप मोडून काढला होता.
'गांधिगिरी' हा शब्द त्या वेळी अस्तित्वात नव्हता. लोकांनी जे काही केले ते स्वयंस्फूर्तीने. पण एखाद्या त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टीचा विधायक वापर कसा करता येतो याचे हे उदाहरण.