सुरेख कथा..पण असाच काहीसा प्रकार माझ्या वाट्यालाही आला होता..फ़क्त तो सांगाडा आणि म्हातारी नव्हती. होता तो एक सायकलस्वार..!
ठिकाण होते..तारकर्ली..! चकवा होता... आम्ही ३-४ मित्र गेलो होतो किनाऱ्यावर ..तंबूत राहणार होतो..तंबू वाल्याचे ऑफ़ीस बंद झाले होते.. रात्री फोन बूथ शोधायला म्हणून बाहेर पडलो..साधारण ७:३०-८ वाजले असतील रात्रीचे...बाहेर पडताच एक सायकल स्वार भेटला..त्याने विरुद्ध दिशेला जायला सांगितले.. साधारण २-३ किमी चाललो..पण बूथ काही दिसेना! मग आम्ही आता मागे फ़िरायचे ठरवले. आणि चालू झाला खेळ- चकव्याचा!
आम्ही मित्र चालतोय.. चालतोय..तरी आमचा तम्बू काही येत नव्हता...रस्ता तोच होता...पण आता रस्त्यावर कुठल्याशा नदीचे कि खाडीचे पाणी आले होते..रस्ता पूर्ण बंद! आता आम्ही जिथे मिळेल तिथून परतायचे ठरवले होते..
त्या भयानक झाडांमधून कशी बशी वाट काढत कसे बसे आम्ही आमच्या तंबूच्या जवळ्पास पोचलो... हूश्श. झाले... पण पुढे काहीतरी वेगळेच वाढुन ठेवले होते..!
आमच्यापैकी एका मित्राला कुठल्याही परिस्थितीत घरी फोन करुन आम्ही तारकर्ली ला व्यवस्थित पोचल्याचे सांगणे अतिशय आवश्यकच होते..त्यामुळे त्याचा असे म्हणणे पडले..की..कोणी बरोबर येणार नसेल, तरी तो एकटाच जाईल दुसऱ्या दिशेने आणि फोन करुन येईल..कारण फोन नाही आला तर घरातले उगाचच काळजी करत बसतील..!
आम्ही सगळ्यांनी त्याला सोबत करायचे ठरवले.. आणि आता पहिल्यांदा ग़ेलो त्याच्या विरुद्ध दिशेने निघालो... साधारण पणे ३ किमी चाललो असु..आता आम्हाला एक पिवळा दिवा (एस टि डी बुथ चा असतो तसा) दिसु लागला...त्या दिशेने आम्ही चालतोय .. चालतोय..पण नक्कि ठिकाणी काही पोचत नव्हतो.. एक अतिशय भयाण असे 'भूतनाथ मंदीर' आम्हाला दिसले..तिथली झाडं तर अगदी पराकोटीची भयानक भासत होती...आता पर्यंत चेष्टा मस्करी करत चाललेले आम्ही सगळे आता मात्र आतुन थोडे टरकलो होतो.. रात्रीचे १२-१२:३० वाजले होते...आणि पाहतो तर काय..तोच म्हातारा सायकलस्वार एकदम आमच्या शेजारुन चाललाय... एवढ्या सुनसान वाटेवर अगदी एखादे कुत्रं जरी रस्त्यावरुन गेले असते तरि सहज कळले असते..तिथे हा माणूस आम्हाला आमच्या समोर च्या बाजुने येताना आतापर्यंत नाही दिसला..आणि दिसला तो एकदम शेजारुन चालला होता.. बरं, आमच्यापैकी कोणीही दारु वगैरे घेत नाही..म्हणजे..दारूमुळे भास झाला असेही नाही म्हणता येणार...!
तो आम्हाला क्रॉस करुन गेला आणि थोड्या अंतरावर थांबला.. आणि मागे वळून आमच्याकडे बघून अतिशय कुत्सितपणे हसला.. त्याची ती जीवघेणी नजर आठवली की आजही मनाचा थरकाप उडतो.
आता मात्र आम्हाला पुढे जाणे शक्य नव्हते!.. आम्ही त्याच पावली परत फ़िरायचे ठरवले.. सगळ्यांचीच बोबडी वळली होती..
आम्ही झपाझप पावले टाकत... अजिबात इकडे तिकडे न बघता सरळ परत आलो...रात्रीचे तीन वाजले तंबूकडे परतायला...! तंबूमध्ये जे गुरफ़टून झोपलो..ते दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता च ऊठलो..प्रत्येकाचे अंग अतिशय दुखत होतं.. चहा घेतला ...आणि चहा वाल्या आण्णाला हा प्रकार सांगितला..तो म्हणाला - " चकवा!"
बस्स.. पुढे कुठलाही विचार न करता सामान गुंडाळले आणि तडक परतीची एस टी पकडली..