'स्टॉक क्लियरन्स' ह्या नांवाखाली ७० ते ८०% पर्यंत किंमतींत घट करून विकणारे तयार कपड्याचे व्यापारी (कुटॉन्स, पँटलून्स वगैरे) ह्यांचा तेजीच्या काळातला फायदा किती असावा ???
मात्र 'स्टॉक क्लियरन्स' चे हे सेल्स खरेखुरे असतात कारण आमच्याच इमारतीत राहणाऱ्या एका विक्रेत्याचे दुकान आहे व तो हे का घडते ते सांगतो.
मुंबईसारख्या ठिकाणी उत्पादकांना माल ठेवणारी गोदामे जास्त किंमतींत परवडत नाहीत. मालाच्या किंमतींपेक्षा गोदामाचे भाडे जास्त ही विसंगती कधीकधी घडते. जास्त व मर्यादेबाहेरचे उत्पादन, बदललेली कपड्यांची फॅशन वगैरे कारणे ह्या मागे असतात. परदेशी पाठवला जाणारा तयार कपड्यांचा माल वेळेवर पूर्ण न झाल्यास किंवा थोडा रंगात/कापडाच्या पोतात फरक असल्यास नाकारला जातो (एक्स्पोर्ट्स रिजेक्ट वा सरप्लस) तो माल कमी किंमतींत विकला जातो. फोर्टला रस्त्यावर बसलेले फेरीवाले किलोच्या भावात कपडे विकत घेऊन विकतात असे ऐकीवात आहे. (अर्थात त्याशिवाय त्यांना इतका कमी भाव परवडणारच नाही)
तर इलेक्ट्रॉनिक्स गुड्स मागे इतर कारणे असतात. देवू, ओनिडा, व्हिडीओकॉन सारखे उत्पादक त्यांच्या लोकप्रिय उत्पादनांबरोबर अ-लोकप्रिय उत्पादने घेण्याची सक्ती वितरकांवर करतात. उदा: "२५ फ्रीजचा पुरवठा करू पण ५० इस्त्र्या घ्याव्याच लागतील."
वैद्यकीय क्षेत्रांतही चांगला खप असलेली उत्पादने घ्यायची झाल्यास वितरकाला कंपनीची इतर औषधे विकत घ्यावीच लागतात.   
सेल च्या मागचे खरे कारण काय आहे हे नेमके कळल्यास अशा वस्तू घेण्यास हरकत नाही असे माझे मत आहे.