विमान वाहतूक कंपनीच्या कर्मचारी वर्गाचे म्हणणे वेगळेच आहे हे बातमी वाचून कळते. कित्येकदा मोठ्या कंपन्यांना अकारण कोर्टकचेऱ्यांमध्ये अडकवल्याची उदाहरणेही कमी नाहीत.
मात्र खरोखर जर विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्तनपानास आक्षेप घेतला असल्यास ही गोष्ट निषेधार्ह आहेच.  
भारतात कित्येक सार्वजनिक ठिकाणी माता आपल्या अपत्याला स्तनपान करीत असते. हे अगदी नित्यनियमाचे व निसर्गदत्त असल्याने आपल्याला त्याचे काहीच वाटत नाही हे मात्र खरे. असल्या गोष्टीही परदेशात बातमीचा, चर्चेचा व निषेधाचा विषय होऊ शकतो हे बघून गंमत वाटली.