काही वर्षांपूर्वी माजोरड्या रिक्षावाल्यांनी अचानक संप केला होता त्यावेळी पुण्यात बसस्टॉपजवळ दुचाकीवाले मुद्दाम थांबून कुणाला लिफ्ट हवी आहे का याची चौकशी करत होते.

शंतनुराव किर्लोस्कर हे शेतकी महाविद्यालयाजवळ रहात. रोज आपल्या कारखान्यात जाताना ते  म्हसोबा गेटच्या बसस्टॉपजवळ थांबून १-२ व्यक्तींना अशी लिफ्ट देत असत. रोज.

साहेब, तुम्ही-आम्ही त्यांच्याशी चढाओढ नव्हे तर त्यांचे अनुकरण म्हणुन तरी असे केले पाहिजे. असे केल्याने -

१. प्रतीमाणशी इंधन कमी जळेल.

२. प्रदूषण कमी होइल.

३. तुमचे खर्च न होता एखाद्याचे पैसे वाचतील.

४. रां*** रिक्षावाल्यांचा माज किंचित का होइना कमी होइल.

५. एखाद्या नवीन इंटरेस्टिंग माणसाशी तुमची ओळख होइल.

आता बोला, लिफ्टदेण्यात वाइट काय आहे?

अ. ना.