वृत्तावर थोडी मेहनत घेतल्यास तुम्ही उत्तम गझल/छंदबद्ध कविता लिहू शकाल, असे वाटते
मी निर्विकारसोडून इतर शेरांना वृत्तात बसवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा बरे-
देवळांचा मांडला बाजार होता
पाहिलेला देव मी लाचार होता
सूर्यही केला जरी काबीज त्यांनी
केवढा त्यांच्या मनी अंधार होता
बदलले ना वागणे माझ्या फुलांचे
रोज काट्यांचा जरी शेजार होता
भोवताली सर्व माझ्या ठार बहिरे
बोलण्याचा अन् मला आजार होता
चित्तरंजन