धर्मांतर करुन चुक झाली का? मुळातच महाराष्ट्रात हिंदु धर्म त्यातील पोटजाती हे सर्व बहुसंख्येने आहे. त्यामुळे त्यांच्या चालीरिती ,सण ,लग्न बघावयास गेल्यास एकच आहेत (वेगवेगळ्या असल्यातरी) एकच वाटतात. त्यात फक्त बौद्ध समाज एकाकी पडतो. शाळा,महाविधालये,कार्यालये यात बहुसंख्येने हिंदु धर्मिय व्यक्ती असतात. त्यांच्याशी बौद्ध समाजातील व्यक्तींचा संबंध येत असतो. मग तो उत्सवाच्या(हिंदुच्या) वेळी त्यांच्या बरोबर तो उत्सव साजरा करत असतो. मग त्यावेळी एखादा (बौद्ध ) आंबेडकरांच्या तत्त्वानुसार चालत असेल तर तो त्या उत्सवात सहभागी होऊशकत नाही. तो एकाकी पडतो(उत्सवापुरता). बाकीच्या समाजाशी एकरुप होऊ शकत नाही. मग तरि प्रश्न पडतो सर्वधर्म समभावाची शिकवण तो विसरतो का? तर नाही .तो विचार करतो हे लोक जर आपल्याला शिव्या देतात तर आपण का म्हणुन यांचे सण साजरे करायचे . असे का ?

आपला

कॉ.विकि