चित्तोपंत....
मी नेहमीप्रमाणेच आपल्या ह्या मतांशी असहमत आहे.
मी नाही मानत की बौद्ध समाज एकसंघ आहे- बाहेर रस्त्यावर दंगली घडवून आणण्याची गोष्ट नाही करीत मी; बेटी रोटीच्या व्यवहाराची गोष्ट करतोय !
चर्मकार, मातंग, मेंढपाळ, नवबौद्ध ह्यांच्यात आपापसात लग्ने लागत नाहीत. एकमेकांच्या घरी जेवतात का ? भुसावळला दोन स्त्रिया आमच्याकडे घरकामाला होत्या, त्यामुळे त्यांची आपापसां बद्दल नेमकी काय मते आहेत हे मी जाणून आहे.
मंडल आयोग व आरक्षण हा मुद्दाच वेगळा आहे. मी त्या मुद्द्याला हल्ली जात-धर्मावरून न गणता व्यक्तिसापेक्ष फायद्याच्या नजरेतून बघतो.
असे नसते तर आमच्या भागातला लेवा पाटील समाज स्वतःला फक्त त्या एकाच फायद्यासाठी ओ.बी.सी. म्हणवून घ्यायला तयार झाला असता का ? ओ.बी.सी. समाज जो सध्या हिंदू धर्माची शिकवण मानतो.... तो आरक्षणाचा फायदा मिळाल्यावर बुद्ध धर्माची किंवा बाबासाहेबांची शिकवण मानेल का ? मुस्लिम समाजही आरक्षणाचे फायदे मिळण्यासाठी स्वतःला अल्पसंख्य म्हणवतातच आहेत ना ?
चित्तोपंत डोळे मिटून दोन क्षण विचार करा व सांगा भारतात सध्या अल्पसंख्य कोण आहेत !
आरक्षण ह्या मुद्द्याला बौद्ध समाजाशी जोडणे आता खूप झाले.... आता व्यक्तिगत फायद्यासाठी आरक्षण व मंडल आयोग हे मुद्दे पुढे येत आहेत.