परभारतीय,
तुमचा क्र. ३ चा मुद्दा बुचकळ्यात टाकणारा आहे. म्हणजे तुमचा तसा अनुभव, निरीक्षण आहे की तसे तुमचे मत आहे, हे लिहिले असतेत तर खुलासा झाला असता.
असे हट्टाने काही चुकीचे कोणी केलेले मी तरी कधी पाहिलेले नाही. मुद्दाम चुकीचे लिहिणे (किंवा मुद्दाम चुकीचे काहीही करणे) हे कुणाला शक्य असेल हे, कठीण वाटते. आणि कुणाला समजा तसे करायचेच असेल असे घटकाभर गृहित धरले, तरी अशी व्यक्ती येथे येऊन चुकीचे लिहिण्यात आपला वेळ, श्रम आणि पैसे वाया घालवून काय मिळवेल असा प्रश्न पडतो.
चुका अजाणतेपणीच होतात असा माझा आजवरचा अनुभव आहे. अशा अजाण व्यक्तीशी सहानुभूतिपूर्वक वाग्विनिमय करण्यानेच सुधारणा होते असे मला वाटते.