अहो माणसे सकाळीच इतकी कावून घराबाहेर पडतात. म्हणजे उठायला उशी झाला, नळाला पाणीच आले नाही, कामवाली उगवलीच नाही, दूध ऊतू गेलं, पोरांचा गृहपाठ झालाच नाही इथपासून ते इस्त्रीचा शर्ट घालायला गेलो तर इस्त्रीवाल्याच्या पानाने त्यावर सही करून ठेवलेली दिसली, बुटांवर पिंट्याने खडूने चित्रे काढली आहेत इथपर्यंत दिवस सुरू होतो म्हणून सकाळी घराबाहेर निघालेले असे म्हटले. त्यानिमित्ताने त्यांचा दिवस बरा जाईल म्हणून.

आता इतक्या गोष्टी सकाळीच घडल्या तर संध्याकाळी कचेरीबाहेर येईपर्यंत काय अवस्था असेल त्याची कल्पना न केलेली बरी.

विषयांतराबद्दल क्षमस्व!

(विषयांतर तज्ज्ञ) प्रियाली