हा फायदा, गैर आहे हे कोण ठरवणार?

वकीलपत्र घेतांना आपल्या अशीलाने खरोखरच गुन्हा केला आहे की नाही या बद्दल वकील अनभिज्ञ असेल असे वाटत नाही. त्यामुळे वकीलाला आपण अशीलाला योग्य फायदा मिळवून देत आहोत की गैरफायदा मिळवून देत आहोत हे निश्चितच ठाऊक असते असे वाटते. या संदर्भांत माझा २२ मार्चचा "करावे तसे भरावे - एक त्रिकालाबाधित नियम" हा चर्चा प्रस्ताव नजरेखालून घालावा.  

न्यायालयाने एखाद्याला निर्दोष ठरवले असेल तर त्यापुढे कोण जाणार?

यांत (मला तरी) हताशपणाची भावना दिसते. याचमुळे ज्याच्यावर अन्याय होतो त्याला न्यायसंस्था आश्वासक न वाटता बेभरवशी वाटते. (बहुधा अन्याय करणारांना ती आशास्थान वाटत असावी).    

'नीती' ही _सर्व_ घटकांनी ठरवलेली असते. त्यात गैरफायदा मिळणारे घटकही येतात. किंबहुना तेच जास्त प्रभावी असू शकतात.

यांतही हताशपणाची भावना दिसून येते. ही अधिकाधिक बळावून योग्यायोग्यतेबद्दलची संवेदनाच नष्ट होऊ नये म्हणून हा विषय चर्चेसाठी मांडला आहे.