रोहिणीताई,
मला स्वतःला इथे मिळणारे यूकॉन गोल्ड जातीचे बटाटे सर्वात आवडतात. त्याला चव छान पिठूळ तरीहि स्वादिष्ट आणि थोडी गोड असते. नुसते उकडून सोलले तर ते हळद घातल्यासारखे पिवळेधमक असतात. ते उकडलले नुसतेच खाऊ शकतो. उकडलेल्या बटाट्याच्या भाजीसाठी ते फार छान.
मोठे रसेट बटाटे हे भट्टीमध्ये (oven) किंवा कोळशावर भाजून खायला चांगले. भाजलेल्या त्या बटाट्यांवर इथे मिळणारे सावर क्रीम, लोणी, कांद्याची पात, हवे असले तर बेकन, सूर्यफुलाच्या बिया, चीज़, तसेच इथे मिळणाऱ्या पावट्याचा सामिष रस्सा (चिली म्हणून डब्यातून मिळतो) असे सजवून घातले तर तेच जेवण होते. वेंडी या शीघ्र उपहारगृहमालिकेतला हा पदार्थ माझ्या मुलाचा एकदम आवडता. पक्की शाकाहारी असलेली माझी पत्निसुद्धा "ते" पदार्थ टाळून असा बटाटा खाते.
तांबड्या सालीचे बटाटे सुद्धा चवीला चांगले असतात, पण माझा कौल पिवळ्या बटाट्यांकडून निश्चित आहे.
तुम्ही स्वयपाकांत तज्ञ असताना हा प्रश्न विचारला याचे आश्चर्य वाटले.
कलोअ,
सुभाष