मला एक गोष्ट आठवली, लाहानपणी वाचली होती,
गोष्ट अशी
ऐक साधु आसतो, त्याच्याकडे एक सुंदर घोडा असतो, एका राजाला तो घोडा फ़ार आवडतो, राजा साधुकडे घोडा मागतो, साधु राजाला नाही म्हणतो, राजा फ़ार प्रयत्न करतो पण साधु ठाम असतो,
ऐक दिवस साधु घोड्यावरुन रपेट मारत असतो, त्याला रस्त्यात ऐक आजारी माणुस पडलेला दिसतो, त्याला लवकर उपचार मिळण्यासाठी साधु आपला घोडा देऊकरतो, जसा तो आजारी माणुस घोड्यावर बसतो तो आजारी माणसाचे सोंग टाकतो, तो राजा असतो,
तेव्हा साधु राजाला म्हणतो, की तु घोडा कसा मिळवला ते कोणाला सांगु नकोस नाहीतर लोकांचा आजारी माणसांवरुन विश्वास उडेल
गोष्टीचा मतीतार्थ काय,
खरच गरज असेल तर लिफ़्ट ह्या प्रकाराला काही अर्थ आहे, पण देणारे आणी घेणारे दोघांनीही ह्या प्रकाराचा गैरफ़ायदा घेतल्याने , लिफ़्ट ह्या संस्थेमधला विश्वास संपला आहे.