जात हे वास्तव स्वातंत्र्याआधीही होतेच. धर्मवार पक्ष किंवा प्रान्तवार पक्ष हे आत्ताचे वास्तव आहे. आरक्षण आणि धर्म किंवा धर्म आणि जातीनुसार मिळणाऱ्या सुविधा हेही आत्ताचे वास्तव आहे. पण त्यामुळे देश विभागला आहे असे नाही. टोकदार अभिनिवेश आहेत. पण देश म्हटल्यावर ते अभिनिवेश मागेही जातातच. सर्वोपरी निष्ठा कोणती, या प्रश्नाचे उत्तर माझ्या मते, देशनिष्ठा हेच असते.