माणूस मरतो म्हणजे नक्की काय होते ?

सोप्या शब्दात सांगायचे तर गाडीचे इंजिन बंद पडल्यावर होते तेच! माणसाचे शरीर म्हणजे अनेकानेक रासायनिक प्रक्रियांचा कारखाना आहे. मी हे लिहिते आहे, मला जे वाटते आहे, आणि हे वाचून तुमच्या मनात जे विचार येत आहेत ते सगळे रासायनिक प्रक्रियांतून होते. हे 'ज्ञान' काही नवे नव्हे. जुनेच आहे. केवळ सामान्य जन ते मानायला तयार होत नाहीत. सगळे रासायनिक असे म्हटले की आपले विशेषत्व कमी होते, असुरक्षित वाटते वगैरे म्हणून. शिवाय हे पटवून देवून तसाही कोणाचा काही फायदा नाही, त्यामुळे कोणी (/मीही) कोणाला समजावून द्यायच्या भानगडीत पडत नाही.

"त्याच्या भरवशावर" (देव) ... असे का?

कारण डॉक्टरलोकही माणसेच आहेत. जशी इतर माणसे श्रद्धावान असतात तसेच डॉक्टरही असू शकतात. आणि माझ्यासारखे शास्त्रज्ञ किंवा डॉक्टरही नसलेले लोक अश्रद्ध असू शकतात. शिवाय आता तुमचा आप्त मरण्याची शक्यता आहे असे थेट सांगण्याऐवजी 'त्याच्या भरवश्यावर' असे सांगणे बरे पडत असावे.

डार्वीनबाबा

उत्क्रांतीविषयीचे गैरसमज कमी व्हावेत म्हणून मी एक लेख लिहायचा प्रयत्न केला होता. पण त्याला यश आले नाही असे दिसते आहे. पुष्कळ उदाहरणे घेऊन आणखी काही लिहिण्याचा प्रयत्न करेन.