यात तथ्य असायला हरकत नाही. मितान्नीबद्दल पूर्वी वाचलेले आहे. तरीही दुव्याबद्दल धन्यवाद. याच बरोबर असिरियन राजांची नावेही हिंदू नावांशी मिळतीजुळती आहेत. उदा. असुरबनिपाल (अशुरबनिपाल)
मितान्नी राजे व इजिप्शिअन राजे यांत रोटी-बेटी व्यवहार चालत असे. मितान्नी राजकुमाऱ्यांची लग्ने इजिप्शिअन फॅरोह्शी झाल्याचे वाचले आहे. किंग टट (तुतनखामेन/ तुत-आँख-आमेन) च्या बहीणीचे (की आईचे??) नाव 'सीतामती' (सीतामट्टी?) असल्याचेही वाचले आहे.
इतकेच नाही तर चक्क इजिप्तमधील एका प्राचीन भींतीवर गीतेचा श्लोक उद्धृत केल्याचेही वाचले आहे.
चू. भू. द्या. घ्या. सदर विषय बऱ्याच दिवसांत वाचला नाही.
इथे मी माझा विश्वास/ अविश्वास दाखवू इच्छित नाही. फक्त इतकेच की हाती लागणारे पुरावे फार ढोबळ आहेत, वाचनातून बरेचदा दृष्टीस पडतात, परंतु एखादा 'सुभाष काक*च' त्यावर वेगळेपणाने लिहिण्याची इच्छा दर्शवतात.
*सुभाष काक यांचे नाव केवळ उदा.पोटी घेतले आहे; पण खरेच की आस्थेने अशा विषयांत रस घेणारे हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच आहेत.