मुळातच हे महाराज ज्यांना रस्ता दाखवतात ते, भटकलेले असतात. आता ते भटकायला काय महाराज जबाबदार आहेत का? नाही ना? पण मग शिकवण तर तेच देतात ना? मग त्यांच्या नावावर का होईना जे लोक त्यांची अशी काही प्रसिद्धी करतात त्याला त्यांचेच विचार कारणीभूत नाहीत का?
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. मग या महाराजांवरील अति श्रद्धा हि देखील मी अंधश्रद्धाच म्हणेन.
जर हे सगळे महाराज एवढे संत आहेत तर मग त्यांच्या नावाने जी काही संस्थाने आहेत ती एवढी श्रीमंत का? आता असे म्हणाल की महाराजांनी त्यांना असे नाही सांगितले की पैसे द्या म्हणून. यात त्यांचा काय दोष? पण असा अतिरेक होवू देऊ नये याची काळजी ते नक्कीच घेऊ शकते असते.
थोडक्यात, जर ते खरंच महान आहेत, त्यांचे विचार महान आहेत ते त्याची दवंडी न पिटता पण त्यांचे विचार आचरणात आणता येऊ शकतात. आता जे प्रस्थ चालू आहे या सर्व महाराजांचे हा अतिरेकच आहे.