सचिनराव,

आता पर्यंत जे थोर संत होऊन गेले, त्यांचे भक्त व विरोधी होतेच.

काळा नुसार त्याचा चेहरा मोहरा बदलला.. उदा: पूर्वी ब्राम्हण समाजातील लोकांनी शिरडीचे साईबाबा, श्री ज्ञानेश्वर ह्यांचा छळ केला (सर्व ब्राम्हण नाही). आताच आधुनिक पिढीतील काही लोक विज्ञानाच्या नावाखाली, इतर लोकांची दिशाभूल करतात. 'देव दाखव नाही तर जगात त्याचे अस्तित्व नाही हे मान्य कर' असा हेका लावतात. पुराणातील वांगी पुराणातच राहूद्या असे सांगताना ह्या लोकांना 'ती वांगी आम्हाला रुचत नाहीत,  पचत नाहीत, समजत नाहीत' हे सांगायला लाज वाटत असते.

विज्ञानाची मर्यादा वारंवार विज्ञानानेच सिद्ध केली असताना हे लोक मात्र जगातील प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक काटकोन, चैकोनात मोजण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

हे लोक, अध्यात्मशास्त्र म्हणजे काय, त्याचा स्वतः अनुभव धेण्यास तयार नसतात. फक्त दोन चार आध्यात्मिक पुस्तके वाचून अध्यात्मशास्त्र समजले अशी प्रौढी मिरवतात. माझ्या मते, अध्यात्मशास्त्र हे स्वानुभवातूनच योग्य रीतीने समजते.  कितीही  पुस्तके वाचली व श्रद्धा नसेल तर  अध्यात्म म्हणजे काय हे समजणारे नाही. अध्यात्मात प्रगती केली आणी नंतर जगात देव किंवा तशी शक्ती नाही असे सांगणारा एक जण हि सापडला नाही.

अध्यात्मशास्त्र व विज्ञान हातात हात घालून जर चालू लागतील तर ते जास्त उपयोगी ठरेल.

आजच्या विज्ञानाने जी प्रगती केली असे आपण म्हणतो, ती अध्यात्मशास्त्राला नवीन नाही. उदा: दूरध्वनी = टेलीपथी (क्षमस्व) , हवाईप्रवास = आकाशगमन अशी अनेक उदाहरणे आहेत.

ऋद्धी - सिद्धी प्राप्ती ही अध्यात्मातील एक पायरी आहे. त्याचे वैशिष्ट्य तुम्हा आम्हा सर्व सामान्य लोकांना. खऱ्या संत मंडळींना त्याच जास्त काही वाटत नाही.

जगात भोंदूगिरी मुळे, जे खरे संत आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये असे वाटते. कोणत्याही खऱ्या संताने भोंदूगिरीला विरोधच केला आहे. भोंदूगिरी फार पूर्वीपासून चालत आली आहे. काही भोंदूबाबामुळे खऱ्या संत मंडळींवर आरोप करणे कितपत योग्य आहे?