सध्या भारतातील सर्व चांगल्यागोष्टी बाहेरून आल्यात यावर "ब्रेन वॉशिंग" चालले आहे. त्यातीलच हा (चर्चेचा प्रस्ताव) एक प्रकार वाटत आहे. अर्थात ह्यात मी 'विकीकरांवर" टिका करत नाही, पण ते सांगत असलेले संदर्भ तयार करणाऱ्यांवर बोलत आहे.

आपण आणि प्रियाली ताईंनी दिलेल्या दुव्यांबद्दल धन्यवाद. मितान्नी बद्दल आज मी प्रथमच वाचलं आणि माहिती इथे दिली. तुम्ही संदर्भा देणाऱ्यांना ब्रेन वॉशिंग म्हटलं समजू शकतो. पण या चर्चेच्या प्रस्तावात असा काही उल्लेख आणि उद्देश दोन्ही नाही. आपण म्हणता त्या भारतातून बाहेर या विचाराबद्दलच्या विकिलेखाचा दुवा देत आहे. आणि मनोगती मध्ये  अभ्यासूंची संख्या पुरेशी असताना चर्चा प्रस्ताव ठेवण्याच स्वातंत्र्य द्यावंत अशी नम्र विनंती.

आऊट ऑफ इंडिया थेअरी

-विकिकर