अहो कॉ साहेब, तुमचे पण फक्त एकच पुस्तक का असते? मार्क्सवादाला आणि वाद्यांना इतर कोणती विचारसरणी का पटत नाही? ती पण एक अंधश्रद्धाच नाही का? कुणाला स्वामी समर्थ/साईबाबा भावत असतील आणि ते इतरांना त्रास न देता लोकशाःइच्या हक्काने भजत असतील तर त्यात काय चूक?(मी कुणालाच भजत नाही) कम्युनिस्टांना लोकशाहीविरोधी मार्क्सबाबा किंवा लेनीनबाबाला किंवा चायना चालले तर मात्र चालते... ती ही एक अफूची गोळीच नाही का?
आणि मजा बघा, मार्क्सवादाला सर्वात विरोध कशाचा वाटला तर तो खऱ्याखुऱ्या लोकशाहीचा (अमेरिकन, ब्रिटीश, भारतीय) किंवा हिंदू धर्माचा - कारण दोन्ही मधे विरोधाला वाव आहे. विचार करा, ह्या मनोगतींना एखाद्या मुल्लाला किंवा ख्रिस्ती धर्मोपदेशकाला (योग्य कारणासाठी) टिका करायला सांगितले तर करतील का? अर्थातच नाही....
कृपया ही व्यक्तीगत टिका समजू नका तसा उद्देश नाही.