विकि साहेब,
कोणत्याही बाबा,बापू,महाराजाचे स्थान(वास्तव्य) एकाच ठिकाणी असते. याला काय म्हणाव.
समर्थ रामदास स्वामी सारखी उदाहरणे सोईस्करपणे विसरता राव. आणि, तुमचा जे महाराज गावो गावी जाऊन समाजसेवा करतात त्यांवरच हेका का?
हा विनाकारणच वाद घालता. समाजसेवा एके ठिकाणी राहून केली किंवा समाजात फिरून केली, तुमचा का आक्षेप?
चमत्कारावर विश्वास ठेवणार हा मूर्ख असतो. असे अंनिस वाले म्हणतात.
अंनिस वाल्यांचा अतिरेक लोकांच्या (सुज्ञ) लक्षात येऊ लागला आहे. अंनिसने भोंदूबाबांना उघडे केल्याचे चांगले काम केले आहे, ह्याचा अर्थ ते म्हणतील ते सर्व खरेच असते असे मानण्याचे कारण नाही. अंनिसचा भडकपण, प्रसिद्धीची हौस हे आपल्या लक्षात येत नाही का?
नामदेवराव ,जे चुकीचे आहे ते आहे. त्याबद्दल बोललेच पाहीजे.
सहमत. पण ते चुकीचे आहे असा तुमचा गैरसमज असेल तर ?
हे बरे आहे आपल्यावर आले की मुल्लाला ,किंवा ख्रिस्ती धर्मोपदेशकाला मध्ये टाकायला आपल्यासारखे मोकळे.
तुम्ही अंनिसवाल्यांच्या खांद्यावर डोके (मेंदूसकट) ठेवता ते चालते का?
समाजसुधारणा आपल्यासाठी महत्त्वाची नाही का?
तुमची समाजसुधारणेची व्याख्या काय ते समजेल का? संत मंडळींवर विश्वास ठेवला तर समाज सेवा नाही, आणि, अविश्वास दाखवाल तर तुम्ही थोर समाज सेवक? समाजसेवेचे इतकीच आवड असेल तर संत मंडळींनी केलेली सेवा कशी विसरता येईल?