मला तर वाटत आहे की अध्यात्म ही एक नशेची गोळी आहे जी घेतल्यावर मनूष्य परमात्मा, आत्मा आणि त्याची उन्नती सारख्या गप्पा मारण्यास सुरुवात करतो.

जो आता भौतिक सुख सोईनी युक्त अशे आयुष्य जगत आहे त्याला ह्या कल्पना कोत्या वाटतात कारण. त्याच्या साठी हे आयुष्यच स्वर्ग आहे आणि हीच त्याची मुक्ति.

आणि जे दारिद्रात आहेत ते दैवाला दोष देतात वा ईश्वराच्या अधिष्ठानाला मान्य करताना दिसतात.

माझ्या मते हे दोन्हीही चुकीचे आहेत!!!

कारण,

ज्यां सुख-दु:खांची आपण बात करत आहोत. हे ही एका मर्यादे पर्यंत आहेत हे आपणांला मान्य  लागेल.

अध्यात्म म्हणजे काय तर आपण आपल्या आणि या विश्वाच्या मूळ अस्तित्व कारकांच्या शोधार्थ फ़िरतो. 

तर आपणांला या प्रकारे फ़िरण्याची गरज काय ?

आपण तसेही ज्या प्रमाणे वैज्ञानिक प्रगती होईल त्याप्रमाणे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणांला कळत जातील असे मला वाटते.

धन्यवाद!!!

भ्रमणध्वनी : ०९२२६७८०६५२. भारत, महाराष्ट्र, चिंचवड, पुणे-४११०३३.