स्वाती,
आपले लिखाण नेहमी वाचतो व नेहमीच आवडते.
खरे तर माझी अशी इच्छा/अपेक्षा आहे की आपल्यासारख्या ती-ती परभाषा (उदा. जर्मन) जवळून जाणणाऱ्या विविध मनोगतींनी आमच्यासारख्या सामान्य पण जिज्ञासू वाचकांसाठी एका-एका भाषेचे प्राथमिक (विशेषत: अचूक उच्चारांचे) ज्ञान देणाऱ्या लेखमाला सुरू कराव्यात. आपल्याकडे (आणि वेगवेगळ्या भाषा जाणणाऱ्या इतर सर्वांकडेही) त्या भाषेत सराईतपणे व्यवहार करण्याएवढे ज्ञान आहे, त्यातले आम्हालाही थोडे मिळावे ही विनंती.
तशीही मराठी ही वेगवेगळे उच्चार लिहिण्याला बहुतांशी अनुकूल आहे, तिचा असाही उपयोग झाला तर आणखी बरे वाटेल.
दिगम्भा