संजोपराव आपल्या एकूण एक मुद्द्याशी सहमत!
मग इतकी वर्षं झाली ह्या उत्क्रांतीचे पुढे काय झाले? माणसाच्यात आजुन बदल घडून पुढे दुसरा प्रगत मानव /प्राणी का तयार झाला नाही... का आजुन माणसाचा एखादा अवयव या उत्क्रांती मध्ये गळून पडला नाही की जो फ़ारसा उपयोगी नाही /
काय हे ! अजूनही यांना होमो इरेक्टस, होमो सॅपियन, होमो सॅपियन सॅपियन माहिती नाही का? माणसात एक अपेंडिक्स नांवाचा सध्या निरूपयोगी असलेल अवयव आहे जो काही पिढ्यांनी नक्कीच गळून पडेल.
उदाहरण चुकीचे आहे. 'क्ष' च्या जागेवर 'य' जरी मानले तरी सिद्धांतात फरक पडत नाही. गजानन महाराजांचा जागेवर जॉर्ज फर्नांडीस यांची आराधना करा म्हटले तर (पडणाऱ्यांना)फरक पडतो. 'गण गण गणात बोते' च्या ऐवजी 'धूम मचा ले धूम मचा ले धूम' असे म्हटले तर (पडणाऱ्यांना) फरक पडतो.
वा! मानलं! छान उदाहरण दिलं आहे.
डॉक्टरांच्या बाबतीत लिहीलेले बेड साईड मॅनरही बरोबरच आहे. कुठलाही खरा डॉक्टर मी प्रत्येक रोग बरा करू शकतो हा दावा करत नाही. आम्हालाही न कळलेले आणि माहिती नसलेले रोग जगात असतातच. पण जास्तीत जास्त वेळा यशस्वी ठरलेले उपचार करणे हे आमच्या हातात असते आणि ते आम्ही करतो. वैद्यकीय शास्त्र फ़ुलप्रुफ़ आहे असा दावा कुणीच करत नाही.
माझ्या बाबतीत म्हणल तर "तोच वाचवेल" असे मी रूग्णाला कधीच सांगत नाही. पण त्याबरोबरच मृत्युशय्येवरिल रूग्णाचे नातेवाईक दुसरे कोणतेही उपचार करू पाहात असतील, उदा. अंगारे, धागे, नमाज, प्रेयर तरीही आक्षेप घेत नाही. एकेकाच्या श्रद्धा असतात.
सध्या पाश्चात्य वैद्यकीय क्षेत्रात याबाबतीत एक अभ्यास चालू आहे की मृत्युशय्येवरील रुग्णाचे नातेवाईक प्रार्थना करीत आहेत की नाही यावर रूग्णाचे भवितव्य(आऊटकम) अवलंबून आहे का? या ट्रायलचे निकाल येताच मनोगतावर जाहिर करण्याचा प्रयत्न करेन.
साती