माधवराव,मृदुला,सुमीत,अंजू,तात्या,साती,अत्यानंद,दिगभ्भा
अभिप्रायाबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!
तात्या, या शाळेचं वर्णन केलं म्हणजे 'माझी शाळा' मला त्यापुढे खुजी वाटते असं नाही.माझ्या शाळेनं मला भरभरून दिलं आहे. आणि ते याच शाळेच्या लेखात २ ,३ ओळीत मावणारं नाही(खरं तर पानभर लेखात सुद्धा मावणारं नाही)त्यामुळे त्यासाठी एक वेगळा लेख लिहायचा मनात होतं.
इथे वर्णन केलेली शाळा युरोपातल्या एका छोट्याशा खेड्यातील आहे जिथे रेल्वे सुद्धा नाही.म्हणून नवल वाटलं की इथे इतकी सुसज्ज शाळा कशी?
टॉयलेट ट्रेनिंग,काळ्या फळ्याच्या बाहेर चित्र न काढणं ..या गोष्टीतून लहानपणापासूनच सामाजिक शिस्त नकळत अंगात मुरत असावी मग त्याचाच + ve परिणाम म्हणून सार्वजनिक स्वच्छता दखल घेण्याजोगी असते हे दिसून येते, हे त्यातून जाणवलं,ते सांगण्याचा प्रयत्न होता. असो.
दिगभ्भा,आपली सूचना आवडली, कशा प्रकारे यात भर घालता येईल यावर विचार करते.आपल्याकडूनही याबाबत मार्गदर्शन मिळाले तर आवडेल.
स्वाती