पेंग्विन्सचे इतके प्रकार असतात हे ह्याच लेखमालेतून कळले. तसेच पेंग्विन आणि ध्रुवीय प्रदेश हे एक समीकरण डोक्यात बसले होते तेही आता बदलले.  तुरेवाले पेंग्विन्स, रंगीत चोचवाले पेंग्विन्स हे सर्व वाचून/ पाहून मजा वाटली.
काही दिवसांपूर्वी इंडियन एक्स्प्रेस मध्ये एका एम्परर पेंग्विनचा फोटो आला आहे. त्याच्या पायाशी नुकतेच जन्मलेले पिल्लू आहे.  पिल्लू अर्थातच अगदी 'क्यूट' दिसत आहे.