एकाच वेळी श्वास घेणे व घास खाणे माणुस करू शकत होता?
माणूस करू शकत नव्हता, कारण जो हे करू शकतो त्या प्राण्याला माणूस म्हणता येत नाही. पण कपी करू शकतात. कपींमध्ये अन्ननलिका व श्वासनलिका एकदम वेगळ्या असतात, आपल्या पडजिभेच्या झाकणासारखे काही त्यांच्या घशात नसते. त्यामुळे ते एकाच वेळी श्वासोच्छवास व गिळण्याची क्रिया करू शकतात.
उत्क्रांतीची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती दिसण्यासाठी लाखो पिढ्या जाव्या लागतात.
म्हणजे वेळ फ़क्त विज्ञानाला हवा आहे.
मुळीच नाही. डासांतील कीटकनाशक प्रतिरोधक जातींविषयी मी लिहिलेच आहे. ज्यांचे आयुर्मान कमी आहे अश्या जीवांमध्ये उत्क्रांती सहज दिसून येते. माणसातील उत्क्रांतीही हॅम्लेट यांनी म्हटल्याप्रमाणे झालेली दिसून येते. लक्षात घ्या, मी लाखो पिढ्या म्हटले आहे, लाखो वर्षे नाही. ज्या जीवांचे आयुर्मान काही तासांचे आहे त्यांच्या लाखो पिढ्यांचे निरिक्षण प्रयोगशाळेत सहज करता येते.
अणुबॉम्ब ने काय केले ? एक उदाहरण पुरेसे आहे
अणूध्वम (मला हा ध्वम शब्द आवडतो!) बनवण्याच्या भानगडीत संगणकीकरणाची पायाभरणी झाले हे तुम्हाला माहित आहे का? लवकरात लवकर अणूध्वमाचे गणित जमावे म्हणून यंत्रे वापरून गणिते करण्याची, ती गणिते विभागण्याची पद्धती जन्मली. त्यातून पुढे संगणक व त्यातून आजचे महाजाल शक्य झाले आहे. अणूध्वमाचा पुरस्कार मला मुळीच करायचा नाही. विज्ञान हे आयुध आहे. ते कसे वापरायचे ते वापरणारे ठरवतात. पण विज्ञानवादी दृष्टी व विज्ञानाचा अंदाधुंद वापर याची गल्लत करू नये.