हा हाक मारण्याचा प्रश्न नाही. डार्विनने जे सिद्धांत मांडले त्यासाठी त्याला आपले सर्व आयुष्य खर्ची घालून अथक प्रयास करावे लागले. त्या सिद्धांताचा उल्लेख तुम्ही ज्या बेफिकिरीने केला ते मला बरोबर वाटले नाही.
म्हणजे डार्विन ने आयुष्य खर्ची घालून सिद्धांत मांडला तर त्याला महत्त्व आहे.
परंतु संतांनी मानवी जीवन अधिक सुखी/समाधानी बनवण्यासाठी काय करायला हवे ते सांगितले आचरणाने दाखवले ते सगळे बकवास की काय?
ही पार्सलिटी नाही तर काय ... आपला तो बाब्या .. असाच प्रकार झाला ना?
आवाज काढणे आणि विविध व्यंजने आणि स्वरांच्या साहाय्याने भाषा बोलणे यात फरक आहे.
फ़रक आहेच.
मग असाच फ़रक संतांमध्ये आणि बुवाबाजी करणाऱ्यांमध्ये आहे हे समजून घ्यायला काय हरकत आहे?
इथेच मृदुला यांनी लिहिलेय :
माणूस करू शकत नव्हता, कारण जो हे करू शकतो त्या प्राण्याला माणूस म्हणता येत नाही. पण कपी करू शकतात. कपींमध्ये अन्ननलिका व श्वासनलिका एकदम वेगळ्या असतात, आपल्या पडजिभेच्या झाकणासारखे काही त्यांच्या घशात नसते. त्यामुळे ते एकाच वेळी श्वासोच्छवास व गिळण्याची क्रिया करू शकतात.
कपी म्हणजे माकडच ना? म्हणजे ज्या माकडामध्ये अशी व्यवस्था होती ती नष्ट होऊन मानवात एकच राहीली असे म्हणायचे का? म्हणजे काहीतरी गफ़लत होतेय एवढे नक्की.
की जे कपी होते त्यांची मानवात उत्क्रांति झालीच नाही. ते वेगळेच. म्हणजे ज्यापासुन मानव तयार झाला तो प्राणी काही तरी वेगळाच असणार. म्हणजे मग डार्विनच्या सिद्धांताचे काय? माकड ते माणुस प्रवास इथेच थांबतो ....
असे होते तर लेखातच डार्विनचा उल्लेख केला नसतात तर बरे झाले असते.
लेखात डार्विनचा उल्लेख नको वाटतो. पण श्रद्धा/अंधश्रद्धेचा उल्लेख आला की साईबाबा / गजानान महाराज आदी संतांचा उल्ल्केह चालतो...
याला काय म्हणावे?
--सचिन