सध्या आढळत असणाऱ्या कपिंमध्ये म्हणजे बिनशेपटीच्या माकडांमध्ये श्वासनलिका व अन्ननलिका वेगळ्या असणारी व्यवस्था आढळते. त्यांचे व आपले जे सामाईक पूर्वज होते त्यांच्यातही ही व्यवस्था आढळते. या सामाईक पूर्वजांमध्ये बदल होत होत सध्याचे चिंपांझी व मानव असे दोन प्राणी तयार झाले. (आणखी काही सुद्धा झाले होते ते कालानुपरत्वे नामशेष झाले.) फक्त चिंपांझी किंवा फक्त माणूस का नाही? कारण हे पूर्वीचे कपि आफ्रिकाभर पसरले होते. जे जंगलात राहिले ते त्यांच्यात तिथे राहण्याला अनुकूल गुणधर्म शिल्लक राहिले, वाढले. त्यांना आपण चिंपांझी म्हणतो. जे पाण्यात (!), मोकळ्या रानात राहिले त्यांच्यात उघडीवाघडी त्वचा (लांब केस नसलेली), दोन पायावर चालणे, बोलणे असे गुणधर्म वाढले त्यांना आपण मानव म्हणतो!

सध्याच्या कोणत्याही माकड जातींपासून माणूस जात तयार झालेली नाही. तर माकडांचे आणि कपिंचे (कपी = चिंपांझी, गोरिला, बोनबो आणि माणूस) पूर्वज एकाच जातीचे होते इतकेच. असो.

सचिन, तुमची संतांबद्दलची कळकळ मला समजते आहे. विरोध संतांना नसून त्यांचे स्तोम माजवून समाजविघातक कार्ये करण्याला आहे.

शिवाय गाडगेबाबा व गजानन महाराज यांना एकाच माळेत ओवू नये असेही मला मनापासून वाटते. गाडगेबाबांनी आयुष्यभर चमत्कारांवर प्रहार केले. त्यांच्या पश्चात त्यांचे विचार नाही पटले तरी त्यांनाच चमत्कार करणाऱ्या लोकांच्या पंक्तीला बसवू नये.

मुद्दा असा आहे की जी काही श्रद्धास्थाने आहेत त्यांच्यावर आंधळेपणे विश्वास ठेवू नये. त्यांच्या नावावर काही गोष्टी खपवणाऱ्या मध्यस्थांवर तर अजिबातच नको. टिळक असोत वा गाडगेबाबा वा आणखी कोणते महाराज ते नक्की काय म्हणाले, त्यांनी काय केले, कोणत्या उद्देशाने हे तपासून पहावे. यातील प्रत्येक जण माणूस असल्याने तो/ती चुका करू शकते हे मान्य करावे. एखादी गोष्ट चूक असेल तर आख्खा माणूसच चुकीचा आहे असे नसते.