मृदुला,
सचिन, तुमची संतांबद्दलची कळकळ मला समजते आहे. विरोध संतांना नसून त्यांचे स्तोम माजवून समाजविघातक कार्ये करण्याला आहे.
आता आपले विचार मिळते जुळते वाटायला लागलेत. :)
श्रद्धा/अंधश्रद्धा चर्चा आली की अशा संतांचा उद्धार करण्याचा परवाना / व्यासपीठ मिळाल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाल्यासरखे वाटते.
कोणीही , अंधश्रद्धा कशी कमी करता येईल याविषयी बोलणार नाही.
दुसरे असे की अध्यात्मिक ज्ञान हे एका वेगळ्या जागेवर आहे . आणि भौतिक ज्ञान वेगळ्या ... माझा समज असाच आहे की विज्ञा हे फ़क्त भौतिक गोष्टींवर काम करू शकते ...
माझे हेच म्हणने, विज्ञानाला विरोध नाहीच. पण संतांचे क्षेत्र वेगळे त्यात त्यांची प्रगती वेगळी आणि ती त्यांनी साधली.
कारण एकच सामान्य माणसापर्यंत ते पोचले. त्यांच्यात मिसळून त्यांनी अध्यात्मिक ज्ञान साध्या शब्दात समजाऊन सांगितले.
हेच विज्ञानाला / विज्ञानवाद्यांना का नाही जमत. ज्ञान मग ते कोणतेही असो, सामान्य मानसाला समजेल असे सांगितले गेले नाही तर त्याचा उपयोग काय?
आणि मग, विज्ञान लोकं ऍक्सेप्ट (मराठी??) करत नाहीत म्हणुन ओरड / त्रागा कशासाठी?
यात आपणच कुठेतरी कमी पडतोय हे मान्य करून सुधारणा करता येतीलच की.
पण केवळ ते जमत नाही म्हणुन मग संतांबद्दल अनुद्गार काढणे कशासाठी?
लोक इतरेजनांचा आहे संतांचा नाही...
हे थांबवले पाहीजे असे वाटते.
पुन्हा एकदा धन्यवाद !
--सचिन