कोलांट्या घेतात मदारी!
सूज्ञ माकडे झाली सारी?

वावा! हा शेर फारच आवडला. (प्रश्नचिह्नाशिवाय वाचल्यावरही चांगला वाटतो आहे.)

मळ्यांत घेऊ हिरवे डॉलर;
पुरे बाजरी, पुरे जवारी

रणरणते एसीतुन कविता
कलंदरी त्यांची सरकारी!

हा संपादक अन्  तो गवई
हा अडत्या अन् तो व्यापारी

वा! मस्तच.

अव्यय, उभयान्वयी मौन हे
शब्द आमचे तसे विकारी

हा शेर मात्र समजला नाही.