कोर्डेसाहेबानी उल्लेखलेले दोष बहुतांश भारतीय भाषांमध्ये आहेत.इंग्रजी अवघड वाटते ते स्पेलिंगमुळे ! भारतीय भाषांत एकदा बाराखडी शिकल्यावर सर्वसाधारण हुशार व्यक्ती कोणतेही पुस्तक वाचू व समजू शकते.आता कोणतीही भाषा न येणारा प्रथम इंग्रजी शिकला तर कदाचित त्याला ती सोपी वाटेल. इन्ग्रजी भाषेत clauses  वापरले जात असल्यामुळे अशा वाक्याचा अर्थही सर्व वाक्य पुरे झाल्याशिवाय लावणे अवघडच जाते.कोर्डे यानी सांगितलेली तुलना फक्त साध्या वाक्याला लागू पडते. अंकवाचन आणि लेखन मात्र भारतीय भाषात अवघड आहे हा त्यानी उल्लेखलेला मुद्दा योग्य आहे. पण त्यावर उपाय नाही.याविषयी साधारण ३०-३५ वर्षापूर्वी गणितज्ञ श्री.म.कृ. राइलकर यानी इंग्रजी पद्धतीने अंकलेखन आणि वाचन करावे (म्हणजे एकवीस ऐवजी वीस एक वगैरे) असे सुचवले होते.पण त्यामुळे सर्व भाषेचीच आकृती बदलत असल्याने त्यावर फार विचार झाला नसावा‌ शिवाय भाषेच्या सोपीकरणात आपण भाषेचीच आहुती द्यायला निघतो हे शुद्धलेखनाच्या नियमांचा जो घोळ घालून ठेवलाय त्यावरून समजते.
त्यामुळे मराठी भाषेला असेच राहू द्यावे.