सचिन राव,
चर्चे मध्ये आपण नक्की कशाला वाहून घेतलं आहे कळत नाही. हे पाहा
आता,
गफलत होतेय तुमची. संत लोकांनी माझी जाहीरात करा असे कुणाला नाही सांगितले. आणी बऱ्याच संतांचे माहात्म्य लोकांना ते गेल्यावर कळले ही खेदाची बाब...
खेदाची कोणासाठी? हिच गोष्ट अनेक शास्त्रज्ञ, खगोलतज्ञ यांच्या बाबत पण झाली आहे. तसेच, जर त्यांचे विचार पटले आहेत तर जाहिरात हवीच कशाला? मग ते सांगू देत वा न सांगू देत. चांगल्या गोष्टींसाठी फार जाहीरात नाही करावी लागत? आता हे व्यासपीठ वापरा यासाठी प्रशासकांनी मनोगताची जाहिरात करावी लागली आहे का? गफलत कोणाची होते आहे नक्की?
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. मग या महाराजांवरील अती श्रद्धा हि देखील मी अंधश्रद्धाच म्हणेन.
अगदी विज्ञानावरची देखिल... शेवटी सगळीकडे "अती तेथे मातीच ..."
इथे मी अगदीच स्पष्ट लिहिले होते. त्यात परत ओढून ताणून विज्ञान कशाला आणायचे?
थोडक्यात, जर ते खरंच महान आहेत, त्यांचे विचार महान आहेत ते त्याची दवंडी न पिटता पण त्यांचे विचार आचरणात आणता येऊ शकतात.
संस्थाने मोठी आहेत... पण ती संत जेव्हा जिवंत होते तेव्हा होती का? त्यावेळी त्यांनी स्वतःचे साधेपण जपले ना?
दोष हा लोकांचा आहे... संतांचा नाही हे मला सांगायचे आहे.
मी प्रश्न या संतांची संस्थाने अन त्याची जाहिरातबाजी यावर उभा केला होता. आपण मान्य करत आहात दोष लोकांचा आहे. त्यांचा दोष आपण पोटात घालत आहात. मग तुमच्या मते ज्यांना माहीत नाही ते थोर लोक ते तर अजाणते पणी असे बोलतात असे म्हणून त्या संतांचे अनुयायी म्हणून तुम्ही पोटात नको का घालायला? एवढा त्रागा कशाला? यावरून मला तरी असे वाटते की तुमच्या श्रध्दास्थानांच्या विषयाला लोकांनी जाहीर हात घातल्याने हा विषय सुरू झाला आहे.
अवांतर,
आपण ज्या महाराजांची नावे लिहिली आहेत, त्यांच्या पैकी कोणी तरी चिलीम ओढताना दाखवले आहे अन त्याच स्वरूपात त्यांची पूजा होते. या वर आपल्याला काय म्हणायचे आहे? आपण आपल्या देवघरात देवांशेजारी बिड्या, सिगारेटचे पाकीट ठेवता/ठेवाल का? धूम्रपानाचे उदात्तीकरण नाही का हे? आणि ते फक्त अंधश्रद्धे पोटी नाही का?