'नॅव्हिगेशन'च्या एका अर्थासाठी 'दिशादर्शन' हा मराठी पर्याय योग्य आहे. परंतु इथे मला तो अर्थ अभिप्रेत नव्हता. To steer (जसे, गाडी चालवण्याच्या बाबतीत) असा 'नॅव्हिगेशन'चा दुसरा अर्थ अपेक्षित होता. यासाठी समर्पक मराठी प्रतिशब्द काय असावा? (थोडक्यात, नकाशा पाहून मार्ग/दिशा ठरवणे किंवा एखाद्यास त्याप्रमाणे योग्य ती दिशा सांगणे असा अर्थ न घेता, योग्य त्या दिशेस वाहन वळवणे असा अर्थ घ्यावा.)
'नियंत्रण' हा शब्द कदाचित इथे चालून जाऊ शकेल, परंतु तितकासा समर्पक होणार नाहीसे वाटते.
- टग्या.