चाणक्य,

म्हणजे तुम्हाला हवे ते तुम्ही करणार?

नाही हो. तसे काही नाही. पण मला जे काही सांगायचे तेवढे मी नक्कीच सांगितले असे मला वाटले. म्हणुन असे म्हणालो की थांबवतो आता.

तुम्हाला हवी तर अजुन चर्चा करू की.

आपल्या इगोला धक्का लागतो म्हणून? तुमच्या पुजा स्थानांना लोक तुमच्या इतकी मान्यता देत नाहीत म्हणून?

प्रश्न माझ्या श्रद्धास्थानांचा/इगोचा नाहीच. प्रश्न आहे तो हा की, आपले विज्ञान वादी विचार पटवून देता आले नाहीत /समाजाच्या तळागाळपर्यंत रूजवता आले नाहीत म्हणून मग सरळ संतांचा उल्लेख अनादराने कशासाठी?

लोक त्यांचे गोडवे गातात हे तुम्हाला पटत/रूचत नाही तर मग लोकांना पटवून द्या की हे संत वगैरे सगळे कसे थोतांड आहे. केवळ त्यांना नावे ठेवून चालणार नाही.

एकमेकांशी बंधु भावाने वागणे, समाज सेवा करणे, स्वच्छता ठेवणे, मन एकाग्रतेसाठी नामस्मरण करणे, कोणतेही काम मन लावून करावे, अशा अनेक गोष्टी संतांनी आपल्या वागणुकीने दिल्या. या सगळ्या आपण सोयीस्कर पणे विसरतो / त्याकडे डोळे झाक करतो.

विरोधाला विरोध मी करत नाहीच. माझा केवळ हाच उद्देश की संतांनी आपले श्रेष्ठत्व सामान्य जनावर सिद्ध केलेय. तसे विज्ञानाने करावे. संत कुठेही विज्ञानाल नावे ठेवताना दिसलेत का? तरी ते लोकांपर्यंत आपले विचार पोचऊ शकतात. पण सगळी साधने उपलब्ध असुनही विज्ञानवादी लोक का नाही व्यवथित पणे लोकांसमोर मांडु शकत... त्यांना संतांचा अनादर करणारे का बोलावे लागते?

आपण तर विज्ञान विरुद्ध महाराज असा लढा उभा केल्याचे चित्र तयार केले आहे.

बघणाऱ्याची दृष्टी..अजुन काय. तसे काही चित्र उभे करायचे नाही मला.

जे आहे ते फ़क्त तुमच्यातला चांगुलपणा समोर येवुद्यात, हे म्हणण्यासाठीच आहे. चांगल्या शब्दात विज्ञान लोकांना पटवून द्या. संतांची हेटाळणी करायची गरजच काय?  

मग तुमच्या मते ज्यांना माहीत नाही ते थोर लोक ते तर अजाणते पणी असे बोलतात असे म्हणून त्या संतांचे अनुयायी म्हणून तुम्ही पोटात नको का घालायला? एवढा त्रागा कशाला? यावरून मला तरी असे वाटते की तुमच्या श्रध्दास्थानांच्या विषयाला लोकांनी जाहीर हात घातल्याने हा विषय सुरू झाला आहे.

पुन्हा तेच, वर सांगितले आहेच. बाकी पोटात वगैरे घेणारा मी कोण.

तसेही सूर्याकडे/आकाशाकडे तोंड करून कोणी थुंकणार असेल तर ... परीणाम त्यालाच भोगावे लागणार... नाही का?

आणि अशा विज्ञान वाद्यांनी नावे ठेवली म्हणुन संतांचे कार्य/नाव कमी थोडेच   होणार.

आपण ज्या महाराजांची नावे लिहिली आहेत, त्यांच्या पैकी कोणी तरी चिलीम ओढताना दाखवले आहे अन त्याच स्वरूपात त्यांची पूजा होते. या वर आपल्याला काय म्हणायचे आहे? आपण आपल्या देवघरात देवांशेजारी बिड्या, सिगारेटचे पाकीट ठेवता/ठेवाल का? धूम्रपानाचे उदात्तीकरण नाही का हे? आणि ते फक्त अंधश्रद्धे पोटी नाही का?

ह्म्म्म. हे म्हणजे लई भारीच ... टी व्ही वर हिरो ने हवेत मस्त झुरके सोडले , बाटल्याच्या बाटल्या रिचवल्या तरी तो "फ़ेव्हरेट" हिरो ठरतो . पण संतां नी चिलिम ओधली तर लगेच धूम्रपानाचे उदात्तीकरण.

आणि सगळ्या गोष्टी सोडुन तुमचे लक्ष फ़क्त चिलिमीकडे ... म्हणजे काय तुम्हाला जे सोयिचे तेवढेच तुम्ही पहाणार.

बाकी च्या चांगल्या वागणुकीकडे बरोबर डोळेझाक... नाही का

आणि कित्येक घरात मुलांचे वडील दारू पितात/सिगारेट ओढतात  ... त्याचे काय . लगेच घराबाहेर काढतात का हो?

इथे मला चिलिम ओढण्याचे समर्थन नाही करायचे. पण आपण काय घ्यायचे यालाही महत्त्व आहेच की.

दगडात पण देव शोधायला एक वेगळी दृष्टी/बुद्धी लागते. देवात दगड शोधायला कशाचीच (दृष्टी/बुद्धी) गरज नाही ...

देव : शब्द "चांगले" या अर्थी नाही तर लगेच देव आहे नाही असा वाद चालू.   

--सचिन