माझे म्हणणे कदाचित नीट मांडले गेले नसेल. जमल्यास त्यात थोडी भर घालून बघु या.
पहिल्यांदी मथळ्यांत लिहिल्याप्रमाणे माझे विचार म्हणजे अनुभव + वगैरे, वगैरे..
३ क्रमांकाचा मुद्दा मांडताना लिहिलेले प्रत्येक वाक्य नीट वाचून बघावे अशी नम्र विनंती आहे. मी लोक चुकीचे लिहीतात असे म्हटले नाही, तर ते तसेच लिहिण्याचा त्यांचा आग्रह आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. मी कोणाबद्दल लिहितो आहे, हे जर आपण इथे जाहीर झालेली पत्रे/प्रकटने वाचली तर सहज आढळून येईल. अशा १-२ व्यक्ति इथे निश्चित आहेत. त्यांचे सर्व विचार, शिक्षण (लिखाणांतून दिसणारे) पाहिले असता त्या व्यक्ति पुस्तकी ज्ञान खूप असल्याशिवाय ते विचार व्यक्त करूच शकत नाहीत. असे असताना त्यांच्या लिखाणात "ण" ऐवजी कटाक्षाने "न" का आढळतो? मी माझ्या कुवतीप्रमाणे त्याचे कारण सांगीतले आहे. अर्थात मा सर्वस्वी माझाच "विचार" आहे हे लक्षात घ्या ही विनंति.
सांगा तुमचे काय म्हणणे आहे?
परभारतीय